logo

गद्धाराना पराभूत करून जमिनीत गाडा; उद्धव ठाकरेंचे घणाघाती आवाहन ! चिखलीत बंडखोरासह भाजपला केले टार्गेट* नरेंद्र खेडेकरांचे भाषणही ठरले प्रभावी; म्हणाले, आमचे हिंदुत्व म्हणजे मनात राम आणि हाताला काम

चिखली लोकसभा निवडणुकीत एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला पाय उतार करून जिल्ह्यातील शिवसेनेच्या गद्धाराना पराभूत करून जमिनीत गाडा असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले
आजपासून बुलढाणा दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंची

पहिली सभा आज गुरुवारी (दि २२) चिखली येथे पार पडली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी बंडखोर व भाजपावर टीकेचा आसूड उगारला. राजा टॉवर येथे रणरणत्या उन्हात पार पडलेल्या या सभेला सेना नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह शिवसैनिक बहुसंख्येने हजर होते. यावेळी ठाकरे यांनी गद्धाराना लक्ष्य केले. शिवसैनिक व जनतेच्या ताकदीने मोठी झालेले गद्धारी करून तिकडे गेले. त्यांना ५० खोके लखलाभ होवो, पण त्यांना आता जनतेची साथ, आशीर्वाद लाभणार नाही हे नक्की आहे. त्यांनी आमचा धनुष्य चोरला, पक्ष चोरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र काहीही केले तरी त्यांच्या कपाळावरील गद्धारीचा काळाकुट्ट डाग पुसला जाणार नाहीये! येणाऱ्या निवडणुकीत जनता जनार्दन त्यांना त्यांची जागा दाखविणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांना हमीभाव नाही पण गद्दारांसाठी ५० खोक्यांचा हमीभाव असा टोला त्यांनी लगावला
માજ્ઞા નરદ્ર માદ્રાના વવાવતરુ વિરાય નાહા, તર ત્યાવ્યા હુ મશાહાભા अन एकाधिकारशाही ला विरोध आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही या हुकूमशाही विरुद्ध आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही मतदारांची देखील कसोटी पाहणारी ठरली आहे. हुकूमशाही हवी की लोकशाही? याचा सारासार विचार करून मतदान करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे
कुठे गेला महाराष्ट्राचा स्वाभिमान?
उत्तरे कडील हजारो शेतकरी पुन्हा दिल्लीच्या सीमेवर आले आहे. निडर पणे आंदोलन करीत आहे. गोळीबार, अश्रूधुर असे केंद्राचे अन्याय सहन करीत ते आंदोलन व आपल्या मागण्यांवर ठाम आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी हमी भाव नाही की भाव नाही, अतिवृष्टी ची भरपाई नाही, पीक विमा नाही तरी शांत आहे. बुलढाण्यात ही असेच चित्र आहे. जिजाऊंच्या बुलढाणा जिल्ह्याचा अन शिवरायांच्या महाराष्ट्रचा स्वाभिमान गेला तरी कुठे? असा उद्विग्न सवाल ठाकरेंनी यावेळी केला. काँगेससोबत का गेलो? यांचे उत्तर देताना त्यांनी भाजपने अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच्या वचनाचा भंग केल्यामुळे हे केलें. त्यांनी शब्द तोडल्याने हे करावे लागले. पंतप्रधान वाजपेयी मोदींना बाहेर फेकायला निघाले तेंव्हा फक्त बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना वाचविले, त्यांचे समर्थन केले, हे सत्यही 'ते' विसरले अशी टीकाही त्यांनी केली

नरेंद्र खेडेकर म्हणाले, आमचे हिंदुत्व म्हणजे मनात राम आणि

हाताला काम!

चिखली येथील जंगी जाहीर सभेत जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांचे छोटेखानी भाषण प्रभावी ठरले. सभेला उशीर झाल्याने व उद्धव ठाकरेंना जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून इतर नेत्यानी आपली भाषणे थोडक्यात आटोपली. नरेंद्र खेडेकर यांनीही शिवसेनेत आजवर केलेल्या कामाचा आढावा सादर करीत सेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगितली. यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर त्यांनी टीव तोफ डागली. पंधरा वर्षे आमदार, मंत्री, तीनदा खासदार राहिले तरीही पोट भरले नाही, मग गद्धारी बी केली. मात्र जिल्हा मागासलेलाच राहिला, जालना खामगाव रेल्वेमार्ग, नदीजोड प्रकल्प कागदोपत्र राहिले त्यामुळे येत्या निवडणुकीत गद्दारांना पराभूत करून जमिनीत
गाडा असे आवाहन खेडेकर यांनी केले
नरेंद्र खेडेकर म्हणाले, आमचे हिंदुत्व म्हणजे मनात राम आणि हाताला काम!

चिखली येथील जंगी जाहीर सभेत जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांचे छोटेखानी भाषण प्रभावी ठरले. सभेला उशीर झाल्याने व उद्धव ठाकरेंना जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून इतर नेत्यानी आपली भाषणे थोडक्यात आटोपली. नरेंद्र खेडेकर यांनीही शिवसेनेत आजवर केलेल्या कामाचा आढावा सादर करीत सेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगितली. यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर त्यांनी टीकेची तोफ डागली. पंधरा वर्षे आमदार, मंत्री, तीनदा खासदार राहिले तरीही पोट भरले नाही, मग गद्धारी बी केली. मात्र जिल्हा मागासलेलाच राहिला, जालना खामगाव रेल्वेमार्ग, नदीजोड प्रकल्प कागदोपत्रीच राहिले त्यामुळे येत्या निवडणुकीत गद्दारांना पराभूत करून जमिनीत गाडा असे आवाहन खेडेकर यांनी केले

0
0 views